एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा ओघवता प्रवास मला खूप आवडतो. Free flowing transition मला अतिशय भावतं आणि मी करत असलेल्या सगळ्या गोष्टीत मी ते शोधायचा, करायचा प्रयत्न करत असते. Architect म्हणून spaces design करत असताना कायम मला दोन spaces च्या मधलं transition design करायला खूप आवडतं. ओडिसी नृत्यात तर एका pose मधून तरलपणे दुसऱ्या pose मध्ये जाणे ही त्या नृत्यप्रकाराची खासियत आहे. पुस्तके वाचतानाही ओघवती भाषाशैली आणि उलगडत जाणारी गोष्ट याच्या मी प्रेमात पडते. या blog च्या निमित्ताने माझ्या मनातल्या तरंगत्या विचारांचा कागदपर्यंतचा (laptop पर्यंतचा) हा एक प्रवास! मध्यंतरी अचानक flow या शब्दाचा अजून एक अर्थ असणारी Psychology मधली ही व्याख्या माझ्या वाचनात आली आणि मला ती खूपच भावली.
Flow (psychology)
"In positive psychology, flow, also known as the zone, is the mental state of operation in which a person performing an activity is fully immersed in a feeling of energized focus, full involvement, and enjoyment in the process of the activity. In essence, flow is characterized by complete absorption in what one does, and a resulting loss in one's sense of space and time."
या flow state मध्ये मी अनेकदा असते, माझ्या जवळच्या, माझ्या आवडत्या अनेक जणांना मी या state मध्ये असलेलं पाहिलेलं आहे. आणि ही state मला प्रचंड आवडते. सगळ्या जगाचे भान विसरून आपल्याला हवी असणारी एखादी गोष्ट झोकून देऊन करणे या संकल्पनेच्या मी प्रेमात आहे. त्या state मध्ये असताना जी एक झिंग चढते आणि ते काम संपल्यावर मनात जे शांत वाटतं ती अनुभवायचीच गोष्ट आहे. अर्थात त्यात नेहमीच आपल्या मनासारखं उतरवता येत नाही याची चिडचिड, काही वेळा तोकडा अनुभव आणि काही वेळा इच्छा असूनही हवा तितका वेळ flow state मध्ये घालवता येत नाहीये ही जाणीव हे सगळं फारच क्लेषकारक असतं. पण तो त्या process चा एक भाग आहे.
मला flow state मध्ये घेऊन जाणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये 'लिखाण' हाही एक छंद आहे ही गोष्ट मला तशी बरीच उशिरा कळली. शाळेत असताना लिखाण म्हणजे निबंध लिहिणे असा समीकरण असल्यामुळे तेव्हा, "हे काही आपल्याला जमत नाही" अशी ठाम समजूत होती. आपल्या मनात येतं ते आपल्याला हवं तसं (मार्कांची फिकीर न करता आणि ठराविक साच्यात न बसवता) कागदावर उतरवायची मजा जेव्हा कळली तेव्हा माझं मलाच आश्चर्य वाटलं.
असं मी माझ्यापुरतं काही वेळा लिहिते. आजूबाजूच्या अनेक गोष्टींबद्दल मला काय वाटलं, त्याबद्दलचं माझं मत, एखादा प्रसंग, जुनी आठवण, एखादी भावलेली व्यक्ती अशा काही गोष्टींबाबत अगदी आतून काहीतरी लिहावासं वाटतं. त्या निमित्तानी हा blog. माझ्या मनातले तरंग Cloud मार्फत तुमच्यापर्यंत... नक्की वाचा आणि मला तुमचा अभिप्राय कळवत रहा.
Eager to read u dear...
ReplyDelete